माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन.
आलदंडी येथे कुक्कुटपालन केंद्राचे उदघाटन.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी:- महिलांनी निर्भीडपणे व्यवसाय व व्यापार क्षेत्रात पदार्पण करून आर्थिक बळकटीकरण करून घ्यावे.महीला बचतगट व संघटना तूनच विकास साधता येते. यासाठी महीलांनी बचत गट मोठ्या प्रमाणात स्थापित करून वेगवेगळे व नाविण्यपुर्ण व्यवसाय करावे.महीलांनी महीला बचत गटाच्या माध्यमातुन व्यवसायाकडे लक्ष घालून स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे व्हावे असे आवाहन गडचिरोली माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केले.अहेरी तालुक्यातील पेरमिलीे येथुन दोन किमी अंतरावर असलेल्या आलदंडी येथे शुक्रवार 8 ऑक्टोबर रोजी कुक्कुटपालन केंद्राच्या उदघाटना प्रसंगी प्रमुख अतिथीच्या स्थानावरून बोलत होत्या.यावेळी मंचावर उदघाटन स्थानी जिल्हा महिला कुक्कुटपालनचे अध्यक्षा पदमा आलाम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकल्प अधिकारी अंकित (भा. प्र.से.), जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार, अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, पेरमिली ग्रा.पं. चे सरपंच किरण नैताम, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी,ग्रा.प.सदस्य प्रमोद आञाम,बंन्डु आञाम,रजिता मुळावार,राजक्का आञाम, तुलसीराम चंदनखेडे तसेच महिला बचत गटातील पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


