गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :-निस्वार्थ मदतकार्यांत सहभागी होऊन संपुर्ण महाराष्ट्रात सेवाकार्यांचा वसा हाती घेत सुरु केलेल्या आधारपर्व फाउंडेशन सेवेमध्ये देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे घेता घेता देणार्याचे हात घ्यावे या संकल्पनेतुन फाउंडेशनच्या माध्यमातुन बेघर,गरीब गरजु,अपंग,निराधार परीवारातील कुटुंब मदतकार्य गेल्या मागील महिण्यापासुन सुरु आहे बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुर शहरातील दिव्यांग बांधव अक्षय पाटील व तेल्हारा येथील आशुतोष नृपनारायण निराधार कांताबाई जवंजाळ यांना एका महिण्याचा किराणा किट देऊन मदत आधारपर्व फाउंडेशनच्या वतीने केल्या गेली हे मदतकार्य सदर ग्रुप सदस्य तसेच लोकवर्गणीतुन होत आहे आपल्या भागात आपण जिथे कुठे असणार तेथुन कोणत्या तरी गरीबांच्या तोंडावर आपल्यामुळे आनंद बघता येऊ शकतो या सामाजीक मदत सेवाकार्यांच्या अभियानात आपण फुल ना फुलाची पाकडी म्हणुन मदत करावी ज्यांची मदत करायची ईच्छा असेल त्यांनी आधारपर्व फाउंडेशनच्या सेवाकार्यांत सहभागी व्हावे मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या असे फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रद्धा गढे यांनी कळविले.











