महेश बरगे ग्रामीण प्रतिनिधी अंबड
अंबड दि.3 अंबड / बदनापूर तालुक्यातील दावलवाडी, हलदोला, पिरसावंगी, गोकुळवाडी, दुधनवाडी, सोमठाणा, मालेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. बदनापूर विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी, मका, आदींसह मोसंबी, डाळिंब, ऊस, आदी फळपिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असल्याने शेतकरी हवालदिन होऊन आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मा. मुख्यमंत्री उध्वव ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने असून मा. उध्दव ठाकरे नक्कीच शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरघोस मदत करतील अशी ग्वाही माजी आमदार संतोष सांबरे यांनी शेतकऱ्यांना संवाद साधतांना दिली.
यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांच्यासमवेत किसान सेना जिल्हा संघटक भानुदास घुगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य कैलास चव्हाण, पंचायत समिती सदस्य श्रीराम कान्हेरे, पद्माकर पडुळ, परमेश्वर मात्रे, संतोष नागवे, निवृत्ती कडोस, गणेश लोंढे, जनार्दन कोलते, दिलीप मेंढरे, कृष्णा कडोस, कैलास जगरवाल, आबासाहेब मात्रे, प्रकाश मात्रे, अर्जुन मात्रे, बाळू बोरुडे, मदन बोरुडे, बाळासाहेब मात्रे, मुरलीधर मात्रे, देवकरण शेळके, राजू मात्रे, साहेबराव जाधव, सुभाष मात्रे, रामेश्वर मात्रे, गजानन मात्रे बिबीशन मात्रे, अमोल कदम, गोपीराज लोंढे, आबासाहेब सावंत, रणजित सावंत, गणेश लोंढे, अभिषेक लोंढे, बळीराम कदमकैलास शिंदे, गणेश कदम, शाम कदम, प्रशांत कदम, मनीष कदम, राजू राठोड, नाना शिंदे, संदीप शिंदे, सुभाष पवार, रामदास चव्हाण, अंकुश शिंदे, बबन नागवे, अंबादास नागवे, गणेश पवार, ज्ञानेश्वर शिनगारे, रामेश्वर नागवे, गौतम गायकवाड, नामदेव नागवे, केदारनाथ नागवे, भीमराव मेंढरे, श्रीमंत मेंढरे, गणेश मेंढरे, कृष्णा वीर, बंडू नागवे, गजानन ठोंबरे, जगन ठाकूर, माणिकराव गायके, प्रल्हाद भडांगे, संतोष शेळके आदींची उपस्थिती होती