श्रद्धा गढे
शहर प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :- बहुचर्चित तेल्हारा खरेदी विक्री सहकारी संस्था ने नाफेड ऑफलाईन खरेदी केलेला ३००क्कीटल हरभरा खरेदी -विक्री सहकारी संस्थेच्या मुख्य प्रशासक सौ अनिता ताई पुंडलिकराव अरबट यांच्या पाठपुराव्यामुळे २८शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. तसे पत्र मुबंई मार्केटिंग फेडरेशन सरव्यव स्थापक डॉ. अतुल नेरकर यांनी आदेश देऊन दिले आहे. सन २०१९-२०मध्ये नाफेडने तेल्हारा खरेदी विक्री मार्फत ऑफलाईन् हरभरा खरेदी केला होता, परंतु लॉट एन्ट्री न झाल्याने २८शेतकऱ्याचे पैसे अद्यापहि मिळाले नव्हते. मात्र शासनाने खरेदी विक्री वर मुख्य प्रशासक सौ. अनिता ताई पुंडलिकराव अरबट व प्रशासक मंडळाची नियुक्ती केल्यानंतर यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरवठा मुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अकोला यांनी दखल घेऊन मुंबई कार्यलयात संपर्क करून ३००क्वीटल हरभरा शेतकऱ्यांना लवकरच परत मिळणार आहे तर ९५क्वीटल हरभरा लॉट एन्ट्री न झाल्याने गहाळ असल्याने तो हरभरा गुलदस्तयात आहे. मात्र मुख्य प्रशासकाच्या पाठपुराव्यामुळे २००क्वीटल हरभरा शेतकऱ्यांना परत मिळणार असल्याचे पत्र मुबंई मार्केटिंग फेडरेशन सरव्यवस्थापक डॉ. अतुल नेरकर यांनी आदेश दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.