गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुक्यातील पावसा ची सततधार चालू असल्यामुळे मुंग, उडीद, यांचे चांगले उत्पन्न होत असते, परंतु या पिकाची पावसामुळे वाट लागली आहे, या पिकाला सुद्धा जबर फटका बसला आहे, म्हणून,शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे,
सध्या सोयाबीन कापणीच्या अवस्थेत आहे, ज्या शेतकऱ्याने आधी पेरले ते सोयाबीन कापणीला आले आहेत, परंतु पाऊस थांबला नाही तर सोयाबीन ला अंकुर फुटण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होणार आहे, काही शेतकऱ्यांचे सोयाबीन हिरवे असून पावसा मुळे शेंगा परिपक्व होण्यासाठी वेळ लागत आहे,सध्या सूर्यनारायणा चे दर्शन कधी घडणार शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे, निसर्गाच्या लहरीपणामुळे मजुरी त सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे,शेतकरी परप्रांतातून मजूर आणण्यासाठी धावपळ करीत आहेत,सर्व शेतकऱ्यांचा सोयाबीन कापणी चा सीजन एकच वेळ येत असल्यामुळे मजूर वर्गाची ची कमतरता दिसून येत आहे, यावर्षी खर्चात सुद्धा जास्त प्रमाणात वाढ झाली आहे,सोयाबीन च्या भावात सुद्धा घसरण झाली आहे, पाऊस कधी थांबणार आणि सोयाबीन कधी घरी येणार खर्च निघतो की नाही या चिंतेत शेतकरी हवालदिल झाला आहे “आमदनी अठन्नी खर्चा रुपया”अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे,
“यावर्षी भरपूर प्रमाणात पावसाने हजेरी लावली, वेळेवर पाऊस आल्यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची सुद्धा शक्यता होती,परंतु पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला .तरी महाराष्ट्र सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा.शेतकरी राजा ला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दयावी “
गजानन ज्ञानदेव वडतकार
युवा शेतकरी गाडेगांव