महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.27: डॉं. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थिनी कृषिदूत ऋतू पेटकर हिने ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत भद्रावती तालुक्यातील कोंढा या गावी शेतकऱ्यांना आंब्याची मृदकाष्ठ कलम बांधण्याची पद्धत याबाबत प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. विद्यार्थिनीने प्रात्यक्षिक करून दाखवताना सांगितले की रोप कोवळ्या अवस्थेत असताना जो स्टॉक म्हणून वापरण्यात येतो तो 8 सेमी एवढा आढवा घ्यावा व 2 ते 3 सेमी उभा छेद द्यावा. सायन हे 3 महिने ते 11 महिने वयाचे असावेत. सायन हे स्टॉकच्या उभ्या छेदात व्यवस्थित बसेल या पद्धतीने काप द्यावा व त्यास प्लास्टिक ने व्यवस्थित बांधून द्यावे, बांधलेली कलमे बाविस्टीन च्या द्रावणात बुडवून घ्यावी ज्यामुळे बुरशी लागणार नाही. कलमच्या सुरुवातीच्या अवस्थेत शेडमध्ये ठेवून आवश्यक तेवढे पाणी द्यावे साधारण वीस दिवसांनी कलमाला फूट येते.यावेळी विजय मते पाटील, संजय खोब्रागडे, घनश्याम शेंडे, मारुती पेटकर यांची उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉं. आर.अ. ठाकरे, उपप्राचार्य एम.व्ही. कडू सर, कार्यक्रम अधिकारी शुभम सरम सर आणि विशेष तज्ञ प्राध्यापिका दीपाली धोत्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.











