किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर:- सामाजिक सलोख्यातून स्वयंप्रेरणेने आयोजित अकोला येथील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर विनय जी खंडेलवाल यांनी आज हृदय मधुमेह व किडनीच्या रुग्णांना पातूर व ग्रामीण भागातील सेवा देण्याकरिता लोकसेवा परिवार तसेच लोकसेवा क्लीनिक यांच्या सहकार्याने व आपले पातुर एक ऐतिहासिक शहर मित्र परिवाराकडून डॉक्टर विनय खंडेलवाल यांच्या उपस्थितीमध्ये पातुर शहरासह ग्रामीण भागातील 94 रुग्णांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला आरोग्याचे निदान करण्याकरिता डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रथोमोपचार करण्यात आले.
यावेळी डॉक्टरांनी अनेक रुग्णांना आरोग्य संबंधित योग्य मार्गदर्शन करून औषधोपचार करण्यात आले, त्याचबरोबर शुगर तपासणी , ब्लड प्रेशर तपासणी, यासह ई.सी.जी तपासणी करण्यात आल्या , यावेळी आरोग्य शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी आयोजक अजिंक्य प्रकाश निमकंडे यांच्यासह, गणेश करंगाळे, गुलाब पाटील,निखिल इंगळे,अक्षय गाडगे,संचित काळपांडे,आदित्य इंगळे,प्रज्योत गवई, हर्षल शेलारकर,आदित्य वि इंगळे ,रोहित गाडगे,हरीश खराट,अभिषेक उगले, अजय पाटील,तुषार शेवलकार,देविदास इंगळे,वैभव पाटील,यांनी परिश्रम घेतले.