शेख अकिल
शहर प्रतिनिधी चिखली
चिखली- सोमवार म्हणजे चिखली येथील गवंडी लोकांचा सुट्टी चा, आरामाचा व बाजाराचा दिवस असतो.आपला हा दिवस आरामात न घालवता, नुरानी चौकातील मुस्लिम गवंडी बांधवांनी पुर्ण दिवस गौरक्षण वाडी येथील कब्रस्तानात श्रमदान केले.सदर कब्रस्तानात पावसाळ्यात गाजर गवताची वाढ झपाट्याने होते, त्यामुळे दफनविधी करत असतांना विच्चुकाट्याची भिती नेहमीच असते.त्यामुळे या उपक्रमात औषध फवारणी करुन, गाजर गवत कापून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.काही नवीन कोरफड व कडुनिंबाची रोपं लावण्यात आली.या श्रमदानात आजम ठेकेदार, शे.शमशेर,शे.नासिर,सै.इरफान,शे.इरफान शे.सत्तार,शे.बबलू,शे.साबिर, गजानन डोंगरदिवे, गौतम लव्हाळे तसेच अनेक जन उपस्थित होते.