बुलडाणा, दि. २५: सिंदखेड राजा ऐतिहासिक व पुरातन वास्तूंची पाहणी आज २५ सप्टेंबर रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली. यावेळी पालकमंत्री यांच्या समवेत खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा पुरातन वास्तूंची पाहणी केली. यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ, मोती तलाव, निळकंठेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, राजे लखुजीराव जाधव यांची समाधी यासह अन्य ऐतिहासिक वास्तूंचा समावेश आहे. मान्यवरांनी वस्तूंना भेटी देत प्रत्येक ठिकाणची माहिती घेतली. याप्रसंगी नियोजन समिती सदस्य ॲड नाझेर काझी, नगराध्यक्ष सतीश तायडे, उपनगराध्यक्ष विजय भाऊ तायडे, राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव, समाज कल्याण सभापती सौ पुनम ताई राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मधुकर गव्हाड, राम राठोड, सौ अनुजा ताई सावळे-पाटील, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे, तहसीलदार सुनील सावंत, शाम मेहेत्रे, नगरसेविका सौ सारिका मेहत्रे माजी नगराध्यक्ष राजू आप्पा बोंद्रे, नगरसेवक गौतम खरात, गणेश झोरे, बालाजी मेहेत्रे, योगेश मस्के, नरहरी तायडे, सतीश काळे, राजेंद्र अंभोरे, संदीप मेहेत्रे, पंचायत समिती माजी सभापती जगन मामा सहाने, शहाजी चौधरी, बुद्ध चौधरी आदी उपस्थित होते. तसेच महसूल विभाग पोलीस विभाग पुरातत्त्व विभाग पर्यटन विभाग यासह अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.️


