शेख अकिल
शहर प्रतिनिधी चिखली
चिखली – श्री शिवाजी अभ्यास शाळेत एक मुल एक झाड कार्यक्रम राबविण्यात आला.एक मुल एक झाड उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थीला झाडाचे वाटप करण्यात आले. त्यात चिच, कडूलिंब, वड व आवडा अशा झाडांचा समावेश होता. सदर कार्यक्रमाला मु. घायाड सर,डि.पी.घुले, सौ.शो.अ.सुरडकर, सौ.अ.जी. फुलझाडे तसेच पालकवर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी आवड निर्माण ह्वावी त्या अनुशंगाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात झाड़ांचे पर्यावरणात किती महत्व आहे, हे विषय सर्व शिक्षकांनी आपल्या भाषनातून सांगितले. पालक वर्गाला आपापल्या मुलामुलींना झाड़ांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. शेवटी शळेच्या परिसरात विविध प्रकारची झाड़े लाउन कार्यक्रमाची समाप्ति करण्यात आली.


