शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता रस्त्यावर करावी लागली रोवणी.
रस्त्यावरील जीवघेणे खड्यामुळे नागरिकांना ञास.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली/अहेरी:- अहेरी – महागाव मुख्य रस्त्यापासून वांगेपल्ली-तेलंगाना जाणाऱ्या रस्त्यावर मोठं मोठे जीवघेणा खड्डे निर्माण झाले असून या ठिकाणी नेहमी अपघात घडत आहेत.तसेच रहदारीस ग्रामस्थांना व बाहेरील ये जा करणाऱ्या नागरिकांना नेहमी त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या दुर करण्यासाठी अहेरी येथील सामाजिक कार्यकर्ता दिपक सुनतकर यांनी समस्त वांगेपल्ली, गेर्रा, महागाव व अहेरी येथील नागरिकासह रस्त्यावरील खड्ड्यात रोवणी करून शासन व प्रशासनाच्या लक्ष वेधले आहेत.अहेरी – महागाव मार्ग पासून वांगेपल्ली पुलापर्यंतचा रस्ता तसेच गेरा मार्गाने वांगेपल्ली जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी मोठे मोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत, त्यामुळे गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठी कसरत करत खड्ड्यातुन मार्ग काढत जावे लागत आहे.त्याचप्रमाने नागरिकांनी अनेकदा रस्ता बनविण्यात यावे म्हणून पाठपुरावा करून सुद्धा या रस्ताकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावर उतरून रोवणी करावी लागली.या मार्गावरून येणारी तेलंगाना बस सुध्दा बंद करण्यात आलेली आहे.या रस्त्याकडे शासनाचे नेहमी दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे रस्ते बनवणार की नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे.या उद्देशाने शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या खड्ड्यात रोवणी करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता दिपक सुनतकर, चेतन दुर्गे, वेंकटेश येनप्रेड्डीवार, आशिष सुनतकर, कोटा काका, तसेच परिसरातील नागरिक व महिला तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतले आहेत.