किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : शहरातील प्रगतशील शेतकरी ध्रृवकुमार उर्फ मोती देशमुख यांची सर्वप्रथम सोयाबीनची विक्री… सोयाबीन ला मिळाला ७८०० प्रती क्विंटल भाव… पातुर शहरातील प्रगतशील शेतकरी यांनी आपल्या शेतात सोयाबीन या पिकाची पेरणी जून महिन्यात पहिल्या पावसानंतर केली होती.त्यामुळे हे पिक मुदतीत व सर्वात अगोदर काढणीला आले होते.त्यामुळेत्यांनासोयाबीन हे पिक प्रती एकर सहा क्विंटल होऊन चांगली झडती मिळाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात त्यांचे सोयाबीन ला सर्वप्रथम विकण्याचा मान मिळाला तसेच प्रती क्विंटल ७८०० एवढा भाव मिळाल्याने त्यांना चांगलाच फायदा यावर्षी झाला आहे. मार्केट व्यवस्थापनाने त्यांचा दुपट्टा व टोपी घालून सत्कार केला आहे. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तायडे साहेब,व्यापारी निलेश पाटील,हरीश टप्पे,जुबेर खान, विनोद भालतिलक,उमेश थोटे,व शेतकरी वर्ग तसेच कर्मचारी उपस्थित होते.