राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
मुलचेरा – मुलचेरा ते वेलगूर हे अंतर 20 किमी असल्याने आणि पुर्ण भाग जंगलाने व्यापलेला असल्याने वारंवार वीज जाण्याचा प्रकार घडत आहे. वारंवार वीज जात असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासापासून मुकावे लागत आहे. मुलचेरा येथील उपकेंद्रातून नवेगाव, वेलगूर, किष्टापूर, मैलाराम येल, बाटेलाचेरू, नगर अश्या दोन ग्रामपंचायत अंतर्गत गावात विजेचा पुरवठा केला जातो. परंतु आठवड्यातील 4 दिवस वीज बंदच असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच त्यामुळे सदर बाबीची दखल घेवून मुलचेरा येथे अतिरिक्त 33 केव्ही उपकेंद्र मंजुर करून द्यावे व होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना उपसरपंच उमेश मोहुर्ले, साई नागोसे, सदाशिव शेंडे, सुरेश माहाडोर, प्रफुल शेंडे, प्रविण रेशे, मोरू कोटरंगे उपस्थित होते.