किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
संसर्गजन्य महामारी पासून बचावासाठी संदेशात्मक आणी शासकीय नियमाच्या अधीन राहून गणेशोत्सव साजरा करा
जिल्हा उप अधीक्षक मोनिका राऊत
पातूर : शहर व तालुक्यात सर्व गणेशोत्सव आगमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या मंडळांना आज झालेल्या शांतता कमीटीच्या व मंडळाचे अध्यक्ष तसेच गणेश भक्तांच्या सभे मध्ये पातूर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता सभा घेण्यात आली यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपअधीक्षक मोनिका राऊत तसेच प्रमुख उपस्थिती बाळापुर उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय आव्हाळे ,तर सभेचे आयोजन पातूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार हरीश गवळी,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चौधरी यांनी केले या सभेमध्ये पत्रकारांच्या वतीने प्रदीप काळपांडे तसेच देवानंद गहीले यांनी पातुर शहर व तालुक्यातील गणेशोत्सव बद्दल व कोरोना काळातील पत्रकारांच्या कार्याविषयी माहिती दिली , गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पंचायत समिती माजी सभापती बालू उर्फ अनंता बगाडे यांनी सभेला संबोधित केले व शासनाच्या अधीन राहून नियमांचे पालन करण्याचे तालुक्यातील सर्व गणेश मंडळाला आवाहन केले तर हिदायत खा रुम खा राष्ट्रवादी गटनेते तथा नगर परिषद माजी अध्यक्ष यांनी हिंदू मुस्लीम एकात्मतेचा संदेश दिला. याप्रसंगी पत्रकार प्रमोद कढोणे,स्वप्निल सुरवाडे,संतोष कुमार गवई शेगोकार सर, सतीश सरोदे,रामेश्र्वर वाडी, निखिल इंगळे, संगिताताई इंगळे,रमेश देवकर,व विविध गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते गजानन गाडगे,मंगेश गाडगे,निलेश फुलारी,प्रविण तायडे महेश बोचरे, रंजीत गाडेकर,कैलास बगाडे,अजित अल्हाट,बळीराम खंडारे तसेच इतर गणेश भक्त व मान्यवर उपस्थित होते.


