योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – ग्रामपंचायती अंतर्गत येणा-या सार्वजनिक पथदिव्यांचे कनेक्शन कापण्यासंदर्भात जिल्हाभरातून अनेक तक्रारी येत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विंचू – काटे, तसेच अंधाराचा फायदा घेत वन्यप्राण्याच्या हल्ल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे जीवितहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभुमीवर नागभीड तालुक्यातील सरपंच सेवा महासंघ संघटना आज महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत तथा चिमूर विधानसभा आमदार बंटी भांगडीया यांना आज निवेदन देण्यात आले. असून ग्रामपंचायतींना थकीत वीज बिल भरणा करण्यासाठी जिल्हा परिषद किंवा शासनाने निधी देण्यात यावे. असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायतीने थकित वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे विद्युत विभागाकडून या नंतर कनेक्शन कापण्यात आले. तर सरपंच संघटना यांनी संताप व्यक्त केला असून या नंतर असला प्रकार खपऊन घेतल्या जाणार नाही. अन्यथा तीव्र जण आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सरपंच सेवा महासंघाच्या वतीने देण्यात आला. या वेळी सतीश वारजूरकर जि प गट नेते चंद्रपूर, रोशन ढोक उपसभापती चिमूर, सरपंच सेवा महासंघ चे जिल्हा अध्यक्ष हेमराज लांजेवार, ता अध्यक्ष कमलाकर ठवरे,उपाध्यक्ष अमोल बावनकर, रमेश घुगूसकर, बालू सिद्धमशेट्टीवर, गणेश गद्दमवार, छगन कोलते, प्रशांत कामडी, रवी निकुरे, रवी पर्वते, वैशाली गायधने, योगिता सुरपाम, निशा सोनटक्के, निरजना बावणे सर्व सदस्य सरपंच सेवा महासंघाचे हे उपस्थित होते.


