महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती.दि :30:- महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा वारसा कायम आहे. या राज्यातील पुरोगामी विचारांची क्रांती भुमी आहे. या क्रांती भुमीत पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा भर विस्तारीत होत असताना भद्रावती तालुक्यात संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.सविस्तर वृत्त, असे की महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेल्या पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या भद्रावती तालुका शाखेची कार्यकारिणी दि. २९ आगस्ट २०२१ ला मान्यवरांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली आहे. सदर भद्रावती तालुका शाखेची कार्यकारिणी हि मा.नरेंद्र सोनारकर, विदर्भ अध्यक्ष, मा.निलेश ठाकरे, पुर्व विदर्भ संघटक, मा.रूपेश निमसरकार, जिल्हाध्यक्ष चंद्रपुर, जिवणदास गेडाम, जिल्हा महासचिव चंद्रपुर, यांच्या उपस्थित घेण्यात आली. त्यात सर्वप्रथम मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सदर पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तालुका शाखा भद्रावती च्या कार्यकारणीत तालुका अध्यक्ष पदावर प्रविण चिमुरकर, कार्याध्यक्ष मनोज मोडक, उपाध्यक्ष शिरीष उगे, सचिव तथा प्रसिद्धी प्रमुख उमेश कांबळे, सहसचिव ज्ञानेश हटवार, संपर्क प्रमुख किशोर ठेमस्कार , सदस्य सदानंद आगबत्तनवार, ह्या सर्वाना नियुक्त पत्र देऊन भद्रावती तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.