सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : तालुक्यातील सावत्रा येथिलश्री संत रामजी महाराजांचा जन्म लोणी काळे या गावी पाटील घराण्यात झाला.श्रीमहारांनी संपूर्ण जीवनभर गावो गावी जाऊन किर्तन भजनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले.सर्व जाती धर्मातील लोक श्रीमहाराजांचे शिष्य होते.सावत्रा गावी त्यांचे समाधी मंदिर आहे .प पु श्री स्वामी अमोलानंद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मंदीरातील व्यवस्थापन होत आहे.श्रावण कृ सप्तमीला श्री संत रामजी महाराजांची पुण्यतिथी असते.पुण्यतीथी निमित्त श्री संत रामजी महाराज यांचे वंशज काळे मंडळी प्रसाद व्यवस्था करत असते . पुण्यतिथी निमित्त श्रींच्या समाधीवर अभिषेक.काकडाभजन . हरी किर्तन . महाआरती प्रसाद वितरण करण्यात आले .प पु श्री १००८स्वामी अमोलानंद महाराज यांच्या हस्ते प्रासद वितरण झाले.त्या प्रसंगी जि.प.सदस्य मा देवानंद पवार गावकरी भक्त मंडळी उपस्थित होते.