राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
एटापल्ली (गडचिरोली) :- स्थानिक एटापल्ली नगर पंचायत क्षेत्रातील सन २०१८-१९ व २०२० चे तेंदूपत्ता बोनस प्रलंबित असून नागरिक बोनसच्या प्रतीक्षेत आहे. सदर बोनस तात्काळ देण्यात यावी अशी मागणी आविस सचिव तथा जिल्हाध्यक्ष वि.रा.महा एटापल्ली प्रज्वल नगुलवार यांनी मुख्याधिकारी न.प. एटापल्ली यांना निवेदनातून केली आहे.नगर पंचायत अंतर्गत प्रत्येक गावाचा ग्रामसभा कोष समितीच्या खात्यामध्ये रक्कम जमा असून फक्त बँकेचे व्याज वाढवण्याचा काम करत आहे, परंतु दोन वर्षे जनतेचे दिवाळी, दसरा अंधारात गेले असताना या न.प. क्षेत्रातील एटापल्ली, एटापल्ली टोला, जिवनगट्टा, कृष्णार, वासामुंडी, मारपल्ली गावातील जनता या वर्षीसुद्धा बोनस पासून मुकणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगर पंचायत शासन व प्रशासन या जनतेचा पोटाची भाकरी भरण्याकडे हेतुस्पर दुर्लक्ष करीत आहे. येत्या ५ ते ७ दिवसात नगर पंचायत क्षेत्रातील सन २०१८-१९ व २०२० चे बोनस रक्कम जनतेचा खात्यात जमा न केल्यास कोरोनाला न जुमानता तीव्र आंदोलन करण्यात येईल याला सर्वस्वी जवाबदार शासन व प्रशासन राहतील असा इशारा एटापल्ली नगर पंचायत चे मुख्याधिकारी यांना आविस सचिव तथा जिल्हाध्यक्ष वि.रा.महा एटापल्ली प्रज्वल नगुलवार यांनी निवेदनातून केली आहे.


