अहेरी उपविभागातील अधिकाऱ्यांची घेतली क्रीडा विषयी आढावा बैठक
शारीरिक शिक्षकांनी खेळासाठी अतिरिक्त तासिका घेण्याचे दिले निर्देश.
सौ.निलिमा बंडमवार
उप जिल्हाप्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली / अहेरी : खेळातून ही इतिहास रचता येतो नुकतेच झालेल्या टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत लवलीना बोर्गोहेन या भारतीय बॉक्सर ने कांस्य पदकाची कमाई केली. याच ठिकाणी भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल 41 वर्षांनी देशासाठी कांस्य पदक मिळविले.तर भाला फेक स्पर्धेत निरज चोप्रा सुवर्ण कमाई केले. रविकुमार दहीया 57 किलो फ्री स्टाईल गटात (कुस्तीपटू)फायनल मध्ये पोहचून रौप्य पदकाची कमाई केली.असे अनेक खेळाडुचे उदाहरणे देऊन खेळातूनही इतिहास रचता येतो असे उद्गार आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी तहसिल कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकित बोलत होते.ही आढावा बैठक अहेरी उपविभागातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवार 27 आगष्ट रोजी आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी क्रीडा विषयक आढावा बैठक घेण्यात आले.या आढावा बैठकीत प्रामुख्याने जिल्हा क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, सिरोंचा तहसीलदार हमीद सैय्यद,भामरागडचे तहसिलदार अनमोल कांबळे, मूलचेरा तहसीलदार कपिल हटकर, एटापल्ली येथील तहसीलदार प्रदीप शेवाळे, अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, तालुका क्रीडा अधिकारी जयलक्ष्मी तारीकोंडावार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, अहेरी उपविभागातील प्रत्येक तालुका निहाय क्रीडा विषयी आढावा घेऊन माहिती जाणून घेतले शारीरिक व आरोग्य तंदुरुस्तीसाठी क्रीडा व खेळ अत्यावश्यक असून खेळाची रुची व आवड शालेय जीवनातूनच विद्यार्थ्यांमध्ये यावी यासाठी हायस्कुल शाळेतील शारीरिक शिक्षक शाळेच्या वेळापत्रिकेत योग्य वेळ ठरवून खेळाकरिता क्रीडा संकुलात सरावसाठी अतिरिक्त तासिका घेण्याचे यावेळी आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी निर्देश दिले.तसेच ज्या ठिकाणी क्रीडासंकुल आहेत तिथे अन्य सोयी-सुविधा पुरविण्याचे आणि क्रीडा संकुल नसलेल्या तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्यासाठी भरीव निधीची उपलब्धता करून देण्याचे यावेळी आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी आश्वासन दिले. क्रीडा आढावा बैठकीत अहेरी उपविभागातील प्रत्येक तालुक्यातील संवर्ग विकास अधिकारी, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी व क्रीडाशिक्षक उपस्थित होते.