पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा लातुर : खाद्यतेलाची वाहतूक करणारा एक टँकर औसा शहराजवळ तुळजापूर टी-पॉईंट येथे राष्ट्रीय महामार्गावर पलटी झाला. या घटनेची माहिती पोलिसांच्या आधी आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचली आणि रस्त्यावर लोकांनी केली गर्दी. राष्ट्रीय महामार्गावर पलटी झालेल्या टँकरमधून तेल रोडवर जागोजागी साचल्याने रस्त्यावर वाहतूकीची कोंडी निर्माण झाली. यात जवळपास २३ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद औसा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.दि. २४ ऑगस्ट २०२१ मंगळवारी रोजी रात्री ११ वाजता कीर्ति अॅग्रोटेक लि. सोलापूरहून सूर्यफुलचे कच्चा खाद्यतेलाची वाहतूक करणारा टँकर तुळजापूरमार्गे लातूर येथील किर्र्ती अॅग्रोटेक लि. कडे वेगाने येत असताना औसा येथील तुळजापूर टी-पॉईट जवळ एका दुचाकी वाहनास वाचवताना भरधाव वेगात असलेले टँकर क्र. एमएच -२४ एयू-१५०० या वाहनाने राष्ट्रीय महामार्गावरील औसा येथील तुळजापूर टी- पॉईंंटवरच्या कठड्यावर चढत दिशादर्शक फलकाला आडवे करीत टँकर पलटी झाला. या घटनेची माहिती पोलिसांअगोदर लोकांपर्यंत पोहोचली तोपर्यंत लातूर-औसा रोड महामार्गावर जागोजागी तेल व पाणी साठले होते. लोक, बघ्यांची गर्दी झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही घटना औसा पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील असून या महामार्गावर याच घटनेमुळे अधिक वेळ वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे या मार्गानं प्रवास करण-यांना या समस्येचा सामना करावा लागला. यानंतर वाहतूक कोडीं कमी होऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. सदर टँकरमधील एकूण माल २८ टन सुर्यफुलाचे कच्चा तेलापैकी अंदाजे १७ टन तेल ज्याची किंमत २३ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच गाडीचे अंदाजे ५ लाख रुपये असे एकूण २८ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याने या प्रकरणी फिर्यादी व्यवस्थापक अमितकुमार जगताप यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिस ठाण्यात किरकोळ अपघात नुसार फिर्याद नोंदविण्यात आली आहे. याबाबतचा तपास पोहेकॉ राजेश लामतुरे करीत आहेत .











