अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला ( दि. २० ॲागष्ट २१):-सम्यक संबोधी संस्था अकोला, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, कापशी व माजी विद्यार्थी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रोफेसर डॉ. एम. आर. इंगळे वक्तृत्व करंडक २०२१
राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजी सम्यक संबोधी सभागृह, रणपीसे नगर, अकोला येथे केले आहे. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. ही महाराष्ट्रातील मानाची समजली जाणारी स्पर्धा असुन संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात.स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे आहेत.1) जेव्हा जीवापेक्षा धर्म मोठा होतो तेव्हा अफगाणचा तालिबान होतो 2)अर्थव्यवस्थेचा व्यवस्थेला न समजलेला ‘अर्थ’ 3)मार्कशीट फुल – गुणवत्ता गुल 4)मानवतेच्या खिडकीतून महामारीकडे बघतांना… 5)… तुझ्यातला आंबेडकर कायम ठेव! हे विषय असुन स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे राहतील स्पर्धा ही 18 ते 30 या वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली राहील.स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून होईल.प्रत्येक स्पर्धकास 7 मिनिटे वेळ देण्यात येईल.स्पर्धेत फक्त पहिल्या 50 स्पर्धकांना सहभागी होता येईल.नियोजीत भाषणातून टॉप 20 स्पर्धकांची निवड उस्फुर्त फेरीसाठी केली जाईल.स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये 100 राहील. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जातील.परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांवर बंधनकारक राहील.स्पर्धकांनी आपली नावे 30 ऑगस्ट 2021 पर्यंत नोंदवावीत.कोरोना (covid -19) च्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल.एकुण पाच बक्षीसे ठेवण्यात आली आहेत अनुक्रमे 7000हजार, 5000हजार,3000हजार, 2000हजार, 1500रु राहतील सोबत ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याचप्रमाणे रु 1000 ची पाच प्रोत्साहनपर बक्षीसे व प्रमाणपत्र देण्यात येतील.या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी भाग घ्यावा याबाबतचे आवाहन माजी विद्यार्थी कृती समीती चे विशाल नंदागवळी, राहुल कुरे, अमीत लोंढे, विशाल इंगळे, आदित्य बावनगडे,अभय तायडे,शशिकांत इंगळे,अमित वाहूरवाघ,नागसेन अंभोरे, आकाश जाधव,भरत चांदवडकर यांनी केले आहे.