महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि. 20:-दहावी च्या परिक्षेत भद्रावती तालुक्यातून प्रथम आलेली रक्षा देवराव ऊराडे हिचा श्री साई कॉन्व्हेंट तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अतुल गु॑डावार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.रूपा गु॑डावार, साई कॉन्व्हेंट चे मुख्याध्यापिका कु किरण कोथळे, मुख्याध्यापक.अतुल बडकेलवार आदी मान्यवर म॑चावर उपस्थित होते.कु रक्षा ऊराडे ही श्री साई कॉन्व्हेंट ची विद्यार्थिनी आहे ती शाळेतुन च नव्हे तर भद्रावती तालुक्यातून ९९.६०% गुण प्राप्त करून प्रथमआलेली आहे. हिचा सत्कार श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अतुल गु॑डावार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी तीला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद जुमडे यांनी केले तर प्रास्ताविक कु किरण कोथळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रूपाली न॑दनवार यांनी केले.कार्यक्रमाला अर्चना बदखल खुशाली भगत, स्मिता डाहुले स्नेहा चव्हाण, प्रज्ञा दुपारे, बुलूरानी शहा, सविता खोब्रागडे, शितल पेटकर आम्रपाली रामटेके, मनीषा पारखी,शुब्रोतम मिस्त्री, सुनील दैदावार आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.