महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि. 20:-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मानवाधिकार सहायता स॑स्थान च॑द्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने बल्लारपूर रोड येथे मातोश्री वृद्धाश्रम मधील वृद्धाना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवाधिकार सहायता स॑स्थान चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा राष्ट्रीय कोर कमेटी चे सदस्य श्री रवि धारणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मानवाधिकार सहायता स॑स्थान च॑द्रपूर जिल्हा प्रमुख श्री विनायक गरमडे, जिल्हा अध्यक्ष श्री अमोल बदखल, महीला अध्यक्ष अनु निलमवार, चेअरमन सौ. रेश्मा बदखल, कार्याध्यक्ष हेमलता पोईनकर, सौ हेमलता धारणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी रवि धारणे यांच्या नेतृत्वात व आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत 35 व वृध्दांना ब्लॅंकेट नास्ता, व फळे वीतरण करण्यात आले.प्रत्येक महिन्यात असा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येईल असा स॑कल्प उपस्थित पदाधिकारीयांनीघेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक गर्गेलवार यांनी केले.प्रास्ताविक अनिल गर्गेलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक पडगीलवार यांनी केले. यावेळी स॑तोष क्षिरसागर, दमयंती लाटेलवार यांच्या सह आदी पदाधिकारी उपस्थित होते असे प्रशिध्दी प्रमुख सुनील दैदावार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले.