जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातुर : राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थां,लातूर व रक्तदान हेच जीवनदान ग्रुपच्या वतीने समजारत्न पत्रकार पुरस्कार देण्यात आला पत्रकार भवन लातूर येथे जयप्रकाश दगडे जेष्ठ पत्रकार, संतोषकुमार डोपे वैद्यकीय आधिकरी लातूर डॉ.लक्ष्मण देशमुख जिल्हा शैल्य चिकित्सक लातूर शिवशाहीर संतोष साळुंके पत्रकार रामेश्वर धुमाळ अध्यक्ष बालाजी जाधव आदीच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देण्यात आले. दोन वर्षापासून योजना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस लेखणीच्या माध्यमातून क्षणाचाही खंड न पडता अविरतपणे समाजासाठी वाहून घेणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा एक छोटासा गौरव व्हावा या उद्देशाने राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत रक्तदान हेच जीवनदान ग्रुप महाराष्ट्र च्या वतीने समाजरत्न पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.