सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
शेलगाव देशमुख व लोणी शिवारामध्ये १८ ऑगस्ट रोजी दुपारी अति मुसळधार ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडल्याने शेलगाव देशमुख येथून वाहणाऱ्या शेलार नदीला मोठा पूर आला आहे या पुरामुळे शेलगाव देशमुख परिसरातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील पिकाची नुकसान होण्याची शक्यता आहे त्यासोबतच शेलगाव देशमुख ग्रामपंचायत पंचायत मध्ये पाणी शिरले मुळे घरामधील असलेले गहु इ सामान भिजले आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेलगाव देशमुख जवळच्या शेलार नदीला 10वर्षो मध्ये असा पुर आलेला नागरिकांणी पाहीलेला नाही .डोणगाव बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांचा पूर आल्यामुळे शेलगाव देशमुख चा संपर्क तुटला होता.पावसामुळे ह्या परिसरातील लोकांच्या जमिनी चे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.










