योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – नागभीड तालुक्यातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायमुख येथे दिनांक 19 ऑगस्ट गुरुवार ला सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आले. यासाठी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या प्रयत्नाने तीर्थक्षेत्र विकास निधी म्हणून सहा लाख रुपये मंजूर करण्यात आले. या कामाला आज सुरुवात करण्यात आली. येणाऱ्या काळात या क्षेत्रासाठी पुन्हा निधी उपलब्ध करणार असल्याचे माहिती जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी दिली आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला बाळापूरचे सरपंच प्रशांत कामडी, विनोद गिरडकर, भोजराज नवघडे पंचायत समिती प्रमुख भाजपा, व इतर भाविक उपस्थित होते.