गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- तेल्हारा तालुक्यातील 22 वर्षांपासून रखडलेल्या हिवरखेड नगरपंचायत निर्मितीसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन खिरोडकार यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाला हिवरखेड वासियांचा वाढता पाठिंबा मिळत गेला. अनेक संघटनांनी, संस्थांनी सक्रिय समर्थन केले. आणि एक हजारच्यावर ग्रामस्थांनी साखळी उपोषण करून हिवरखेड नगरपंचायतसाठी लेखी समर्थन दिले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी
आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबई सह्याद्री अतिथीगृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हिवरखेड नगर पंचायत विषयक महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करून तसेच पञ देऊन नगरपंचायत त्वरित घोषित करण्याची विनंती केली. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिव नगरविकास यांना हिवरखेड नगरपंचायत बाबत त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. हिवरखेड बाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते आणि सहकारी पत्रकार बांधवांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. आणि हिवरखेड लवकरात लवकर नगरपंचायत करण्याचे ठोस आश्वासन दिले. आणि उपोषण समाप्त करण्याची विनंती केली.
दुसरीकडे अनिल गावंडे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी प्रत्यक्ष व्हिडीओ कॉलिंग द्वारे फोन करून दोन महिन्यात हिवरखेड नगरपंचायत करण्याचे आश्वासन दिले.
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार अमोल दादा मिटकरी, आणि पालकमंत्री बच्चुभाऊ कडू, ह्या सर्वांकडून हिवरखेड नगरपंचायत करण्याचे ठोस आश्वासन मिळाल्यामुळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेडचे अध्यक्ष अर्जुन खिरोडकार यांच्या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली. त्यांनी चण्डिका माता मंदिरात पूजन करून त्यांचा चिमुकला धनुषच्या हाताने प्रसाद ग्रहण करून आपले यशस्वी उपोषण सोडले. आता हिवरखेड वासियांची ऐतिहासिक मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. उपोषण यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि आदर्श पत्रकार संघाचे संदीप इंगळे, राजेश पांडव, उमर बेग, अनिल कवळकार, राहुल गिऱ्हे, जावेद खान, सूरज चौबे, धिरज बजाज इत्यादींनी परिश्रम घेतले.
आश्वासन दिल्याप्रमाणे दोन महिन्यात नगरपंचायत चे आश्वासन मंत्री महोदयांनी पूर्ण करावे आणि हिवरखेड वासीयांचा विश्वास कायम ठेवावा. आश्वासन पूर्ण न केल्यास हिवरखेडची जनता सामूहिकपणे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.
अर्जुन खिरोडकार, आमरण उपोषणकर्ता.
विविध स्तरातून मिळाला पाठिंबा
अर्जुन खिरोडकर यांच्या आमरण उपोषणाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व आदर्श पत्रकार संघ, हिवरखेड विकास मंच, शिवसेना, लोकजागर मंच, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिलदादा गावंडे, समस्त व्यापारी संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ, सतूर सेना, खाटीक समाज बंधु, लहुजी सेना व मातंग समाज, ऑल इंडिया पॅंथर सेना विविध महिला बचत गट, गुरु भाई मित्र परिवार, एकता फाउंडेशन, सफाई कामगार संघ, विद्यार्थी सेना, अग्रवाल समाज हिवरखेड,यांच्यासह अनेक संघटना आणि हजारो सर्वसामान्य नागरिकांनी साखळी उपोषण करून उत्स्फूर्त सहभागनोंदविला आहे.
आता दिलेल्या कालावधीत शासनाने नगरपंचायत न केल्यास विविध मार्गांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा विविध संघटनांनी दिला आहे.











