भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर “दिंडी मोर्चा”
सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर राज्यातील कोरोना संसर्गाची लाट आता ओसरली असून सर्व क्षेत्रातील निर्बंध शासनाने शिथिल केले परंतु अद्याप पर्यंत मागील दीड वर्षांपासून हिंदू,मुस्लिम यांसह सर्वच धर्मियांची प्रार्थनास्थळे अद्याप पर्यंत बंद आहेत.
नागरिकांचे श्रद्धास्थाने असलेल्या मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा,चर्चा ई सर्वच धर्मियांची प्रार्थनास्थळे राज्य सरकारने भाविकांसाठी खुली करावी, या मागणीसाठी बुलडाणा जिल्हा भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आघाडीचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सिताराम महाराज ठोकळ यांच्या नेतृत्वात आज दि 17-8-2021 रोजी स्थानिक भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवालय पासून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत “दिंडी मोर्चा” काढण्यात आला.
या दिंडी मोर्च्यात मा. आमदार विजयराज शिंदे व मा.आमदार तोताराम कायंदे यांची विशेष उपस्थिती होती. दिंडी मध्ये टाळ, मृदंग, विना घेऊन अनेक भाविक भक्तांनी व भाजपा पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती. यावेळी भाजपा नेत्यांनी सुद्धा गळ्यात टाळ घेऊन भजन अभंग म्हणत,”रामकृष्ण हरी” व “ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम” अश्या अनेक हरिनाम व वाद्यांच्या गजरात समस्त बुलडानेकर व राज्यशासनाचे लक्ष वेधले होते.
यावेळी भाजपा नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की “राज्यसरकारच्या नियमांचा आदर आज पर्यंत भाविकांनी केला आता भाविकांच्या श्रद्धेचा आदर सरकारने करून सर्वच प्रार्थनास्थळे खुली करावी,अन्यथा भाविक अशीच आंदोलने जिल्हाभर करतील असे प्रतिपादन विजयराज शिंदे यांनी केले.
तसेच आध्यात्मिक आघाडी चे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सीताराम ठोकळ महाराज यांनी तीव्र शब्दात राज्यसरकार वर टीका केली. सरकार दारूची दुकाने उघडत आहे,सिनेमाघरे उघडली,हॉटेल बार उघडले मग मंदिरांवर बंदी का? असा सवाल त्यांनी उपस्थित करून सरकारणे मंदिरे खुली न केल्यास आता भाविक स्वतःमंदिराचे दारे उघडतील,असा इशारा सुद्धा त्यांनी आध्यात्मिक आघाडी द्वारे राज्यसरकारला दिला आहे. आंदोलना नंतर जिल्हाधिकारी बुलडाणा यांची भाजपाच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन त्यांच्या मार्फत सदर मागणीचे निवेदन मा.मुख्यमंत्री यांना सादर करून याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
भारतीय जनता पक्ष आध्यात्मिक आघाडीने लोकशाही मार्गाने केलेल्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
या आंदोलनात महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर,तालुकाध्यक्ष सुनीलजी देशमुख,तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे,आघाडीचे जिल्हा सरचिटणीस पंढरीनाथ देवकर, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया सौ नंदिनीताई साळवे,जिल्हा उपाध्यक्ष कडुबादादा पवार, सौ.अलकाताई पाठक महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस, नगरसेवक अरविंद होंडे,विधासभा संयोजक मंदार बाहेकर, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष राजेंद्र पवार, मनीष महाराज राऊत, शिवशंकर गायकवाड, उद्धवराव काळे, भगवान डुकरे, अशोक किलबिले,विष्णू बंडे ,राजू काकडे ,ज्ञानेश्वर इंगळे, दामोदर पडघान , संतोष झाल्टे, तुकाराम पडघान, सुनिल पवार, अंकित पिंगळे, श्रीकृष्ण तायडे,दत्तात्रय देशपांडे, विश्राम पवार, देविदास जाधव ,सौ कुषावर्ता पवार, सौ संगीता पवार, सौ उषाताई पवार ,श्रीमती मंदाकिनी कंकाळ, सौ सुनीता राजगुरे,माजी सरपंच सौ कांताताई राजगुरे,बाळू ठाकरे, अमोल देवकर गणेश देवकर,अनंता शिंदे,यश तायडे,यांसह भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व भाविक भक्त उपस्थित होते.










