योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – चिमूर तालुक्यात सोमवारला मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी शहीद स्मारक येथे वीर बालाजी रायपूरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तसेच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे रक्तपेढीचे उद्घाटन करून शिवभोजन केन्द्र चिमूर येथे भेट दिली. त्यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे प्रमुख उपस्थितीत विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री व शिवानिताई वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रकाश देवतळे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, धनराज मुंगले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दमदार नेतृत्व, शांताराम शेलवटकर माजी उपसभापती, सुधीर पंदीलवार, कमलेश बांबोळे, तानाजी सहारे, देवा नगराळे, संजय सोनवाणे ,सुभाष नेवारे सरपंच मोठेगाव, चंदू रामटेके उपसरपंच, सुभाष करारे माजी सरपंच मानेमोहाळी, लटारू सुर्यवंशी माजी सरपंच अडेगाव शिवभोजन केंद्राचे चालक वैभव विलास डांगे यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली नंतर हुतात्मा स्मारक येथे नमन करून सभा घेण्यात आली. त्यानंतर आधार बंगला येथे युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष संदीप कावरे यांनी शिवाणीताई वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव यांचे सूचनेनुसार आयोजित केलेल्या सभेत मंचावर उपस्थित मान्यवर विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री, शिवानीताई वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव, प्रकाश देवतळे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर ग्रामीण, धनराजभाऊ मुंगले चिमूर विधानसभा क्षेत्र, प्रा.राम राऊत माजी तालुका अध्यक्ष, विलास डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य, संजय डोंगरे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष, घनशाम डुकरे संचालक, गजानन बुटके जिल्हा परिषद सदस्य, ममताताई डुकरे जिल्हा परिषद सदस्या, भीमराव ठावरी माजी शहर अध्यक्ष, चिमूर, किशोर शिंगरे संचालक, प्रफुल खापर्डे सभापती नागभिड प. स., संदीप कावरे युवक काँग्रेस चिमूर विधानसभा अध्यक्ष, खेमराज मरस्कोल्हे जिल्हा परिषद सदस्य, प्रभाकर सेलोकर माजी तालुका अध्यक्ष ब्रम्हपुरी ,यांचे प्रमुख उपस्थितीत सर्व महापुरुषांचे प्रतीमेस पुष्पमाला, अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आली. संचालन माजी प्राचार्य सुधीर पोहिनकर, यांनी केले विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री, शिवाणी वडेट्टीवार प्रदेश सचिव, प्रकाश देवतळे जिल्हा अध्यक्ष, प्रा. राम राऊत, धनराज मुंगले विलास डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य, गजानन बुटके जिल्हा परिषद सदस्य व कृष्णा तपासे यांनी मनोगत व्यक्त केले. सुधीर पंदीलवार यांचे प्रमुख मार्गदर्शनात मनीष नंदेश्वर माजी सरपंच चिमूर, शांताराम शेलवटकर माजी उपसभापती, अरविंद रेवतकर माजी सरपंच भिसी, तुषार शिंदे माजी उपनगराध्यक्ष, नितीन कटारे माजी सभापती, जावाभाई शेख अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष , प्रदीप तळवेकर, यशवंत वाघे, सुनील धाबेकर ,सदस्य संजय गांधी,कमलेश बांबोळे चिमूर कार्यालय प्रमुख,उमेश हिंगे माजी नगरसेवक, उषाताई गावंडे, गिताताई , इंदुरकरताई, वैभव विलास डांगे,धीरज धनराज मुंगले, देवा नगराळे,आणि इतर कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेत संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली. धनराज मूंगले, संदीप कावरे, यांनी पूर्णपणे मदत केली शेवटी आभार राजू दांडेकर यांनी केले.