जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पवार यांचे प्रतिपादन
जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर/ दि.१८ ऑगस्ट २०२१
आज संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीमूळे विविध समस्यांची निर्मिती झाली आहे यामध्ये एकल महिला व बालकांच्या विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. आज या कुटुंबाला रोटरी क्लब होरायजनने शिलाई मशिन देवून एकल महिलांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली असे प्रतिपादन लातूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पवार यांनी केले.रोटरी क्लब लातूर होरायझन द्वारा एकल महिलांना शिलाई वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष रो.प्रा.डॅा.संजय गवई हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा लातूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, रोटरी ३१३२च्या माजी प्रांतपाल रो.डॅा.माया कुलकर्णी, माजी अध्यक्ष रो.डॅा.मल्लिकार्जून हुलसुरे, सचिव रो.निळकंठ स्वामी आणि रो.प्रा.रंजिता वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी कालकथित मनीषा संजय गवई यांना द्वितीय पुण्यानुमोदना निमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलतांना प्रवीण पाटील म्हणाले की, आज कोरोनामूळे अनेक गावातील कुटुंबांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे अशा कुटुंबाला रोटरी क्लब तर्फे मदत केली जात आहे ही एक अनुकरनिय बाब आहे असे सांगून विविध योजनांची माहीती दिली. माजी प्रांतपाल रो.डॅा.माया कुलकर्णी म्हणाल्या की, आपण सर्वांनी कोरोनाबाधित कुटुंबाला आधार देण्याचे कार्य केले पाहिजे त्यामुळे त्या कुटुंबामध्ये नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होईल.यावेळी माजी अध्यक्ष रो.डॅा.मल्लिकार्जुन हुलसुरे यांनी शिलाई मशीन वाटप कार्यक्रमाची पार्श्वभूमी व निवड प्रक्रिया सर्वांना सांगितली.यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सुरेखा नंदकुमार ढेकणे (लातूर), हलिमा हैदर जैनुद्दीन शेख, दापका (निलंगा) व पुष्पा महादेव डोंगरगे (देवणी) यांना शिलाई मशीनचा संपूर्ण सेट देण्यात आला. मान्यवरांचा परिचय रो.विश्वनाथ स्वामी(सावळे), रो.प्रा.विद्या हातोलकर आणि रो.बी.पी.सूर्यवंशी यांनी करून दिला.
या कार्यक्रमामध्ये रो.प्रा.रंजीता वाघमारे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
तसेच निर्माल्य ग्रुपच्या प्रमुख मोनिका राठी, नवीन सदस्य रासेयो कार्यक्रमाधिकारी रो.डॅा.शिवप्रसाद डोंगरे, बालकल्याण समिती सदस्या ॲड.सुजाता माने, सखी वन स्टाप सेंटरच्या प्रमुख प्रा.मंगल जाधव, रो.नानकजी जोधवानी,रो.जाबुंवंतराव सोनकवडे, रो.सुभद्रा घोरपडे, नवनियुक्त रोट्रॅक्ट अध्यक्ष व्यंकटेश हंगरगे आणि वरुणराज सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.रंजिता वाघमारे यांनी केले तर आभार रो.प्रतिमा कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माजी प्रांतपाल रो.डॅा.विजय राठी, रो.बी.पी.सूर्यवंशी, रो.सुधीर सातपुते, रो.विठ्ठल कावळे, राहुल बेलकुंदे, मुकुंद कुलकर्णी व संयम गवई यांनी परिश्रम घेतले.


