गिता सोनोने
तालुका प्रतिनिधी जळगाव,जामोद
जळगाव जामोद- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सुनगाव बीटमध्ये दोन इसम एका मोटर सायकल वर 5 देशी दारूचे बॉक्स घेऊन येत असल्याचे गुप्त माहितीनुसार दिनांक 16 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास जळगाव जामोद पोलिसांनी सापळा लावून मोटरसायकलवर अवैध देशी दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींना पाच देशी दारूचे बॉक्स व त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकल सह रंगेहात पकडले जळगाव जामोद पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की संग्रामपूर तालुक्यातील टुनकी गावाकडून सुनगांव गावाकडे दोन व्यक्ती आपल्या मोटर सायकल वर 5 देशी दारूचे बॉक्स घेऊन येणार आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शना वरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश धामोडे सह पोलीस नाईक उमेश शेगोकार पोलीस नाईक गनेश पाटील अनिल सुशिर यांनी जामोद येथील विद्युत ऑफिस जवळ नाकाबंदी केली असता दोन व्यक्ती आपल्या मोटर सायकल वर पाच बॉक्स देशी दारूचे घेऊन येत असताना दिसला सदर मोटरसायकल थांबलेले असतात मोटरसायकलवर सोपान ज्ञानेश्वर डाबेराव वय 25 राहणार लोहगाव तालुका संग्रामपुर व राहुल मोतिराम हिवराळे वय 22 वर्षे राहणार शेत खेड तालुका संग्रामपुर या दोन आरोपींना पकडले असता त्यांच्याकडे कोकण देशी दारू संत्रा 5000 कंपनीचे 5 बॉक्स त्या प्रत्येक बॉक्समध्ये 180 मिलीच्या प्रत्येकी 48 शिश्या प्रत्येक बॉक्स ची किंमत 2880 रुपये असे एकूण 5 बॉक्स त्या बॉक्स ची किंमत 14400 व मोटर सायकल एम एच 28 बि डि 89 96 किंमत अंदाजे 35000 रुपये असा एकूण 49 400 रुपयांचा मुद्देमाल आरोपी ताब्यात मिळून आला आहे सदर दोन्ही आरोपींना जळगाव जामोद पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अनिल सुशीर करीत आहेत या कारवाईमुळे सुनगाव जामोद या बिटमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.


