अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट 2021 ला पातूर शहरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन लोकशक्ती युवा मंच तथा एकता ग्रुप तर्फे सहारा क्लिनिक इथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तदाते युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लाल खान सवई खान होते तर ठाकरे रक्त पिढीचे चमू सह डॉक्टर मो.वासिक अहेमद(शेख) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रक्तदान शिबिर घेण्यात आले शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. बळीरामजी सिरस्कर,दिनकर वाघ, माजी. न. प.अध्यक्ष हिदायत खान रूम खान,माजी न. प. उपाध्यक्ष सैय्यद मुजाहिद इकबाल, ग्राम पंचायत सदस्य सागर काढोणे,प्रशांत गावंडे संयोजक शेतकरी जागर आदींची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमांमध्ये रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याचे महत्त्व मान्यवरांनी उपस्थित युवकांना समजावून सांगितले सध्याच्या युगामध्ये रुग्णांना रक्ताची फार मोठी कमतरता भासत असल्यामुळे दारिद्र रेषेखालील गोरगरीब रुग्णांना सदर रक्तदान केल्याने त्यांच्या उपयोगी पडेल एवढेच नाही रक्तदान करण्यासाठी सर्वच संत महापुरुषांनी युवकांचे आद्यकर्तव्य असल्याचे म्हटले आहे त्यामुळे समाजाचे ऋण फेडण्यासाठी रक्तदान करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले तर गजानन इंगळे,प्रवीन इंगळे,हाजी लाल खान,सेवा निवृत्त शिक्षक मो.शफीक,सुनील गावंडे,धीरज इंगळे, मो.महेताब,मो.नइम,ऍड, अनवर खान,बग्गा सिंग,मो. फरहान अमीन,सयद फैजान तथा शिरला ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य हे सुद्धा आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजक नातीक शेख,मो.नईम मौलाना,ग्रा.पं. सदस्य सागर काढोणे, फिरोज खान,राहील इकबाल,सयद नफिस,बिडवाले, ह्यांनी मोलाचे परिश्रम घेतले।


