अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू आणि प्रदेशाध्यक्ष संदीप मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली तथा प्रदेश उपाध्यक्ष मंगेश शिरसाट यांच्या नेतृत्वात अकोल्याच्या योगेश भागवतकर यांची प्रदेश संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख सूरज मुळे, पुणे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भिडे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सतीश वनशिव, पुणे शहर महिला आघाडी संपर्क प्रमुख मोनिका गोडे, सुरेखा पाटील, अनुराधा चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.