अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : महाआवास अभियान अंतर्गत पातूर तालुक्याला राज्य पुरस्कृत योजनेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे
पातूर पंचायत समितीचे सभापती सौ.लक्ष्मीबाई जनार्दन डाखोरे , गट विकास अधिकारी, अनंता लव्हाळे,घरकुल तालुका प्रोग्रामर, महेश किसनराव गावंडे यांना मा.पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे जिल्हा परीषद अध्यक्ष श्रीमती भोजने ताई आ.अमोल दादा मिटकरी जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जीश्रीधर पोलीस अधीक्षक व प्रकल्प संचालक श्री गुहाड आदींचे उपस्थिती मध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडलाआहे या योजनेत पातुर तालुका ने प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल पातुर पंचायत समितीच्या सभापती सौ लक्ष्मी ताई जनार्धन डाखोरे व पातुर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे आणि प्रोग्रामर गावंडे यांचे अभिनंदन पातुर तालुक्यात करण्यात आले आहे.