योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर – नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील मैत्रेय मंचच्या वतीने ‘बारबन देवस्थान’ व कन्हाळगाव रस्त्याच्या कडेला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. पर्यावरण रक्षणासाठी थोडेसे योगदान म्हणून गावातील तरुणांनी मैत्रेय मंचाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध जातीचे बारबन देवस्थान व कन्हाळगाव रोडच्या कडेला वृक्ष लागवड करून मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमाला जि.प.सदस्य खोजराम मरस्कोल्हे, तळोधी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बारसागडे, लोक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण बांगरे, सहायक शिक्षक निखारे, घोडमारे, उत्तम बोरकर, देशमुख, स्वाब नेचर केअर संघटनेचे अध्यक्ष यशवंत कायरकर आणि चमु आदींनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी चिंच, वट, करंजी, गुलमोहर, मोह, कडुलिंब, सीताफळ, कवठ आदी पन्नास विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी मैत्रेय मंचचे अध्यक्ष रोहित आंबोरकर, सुरेश बावनकर, विशाल आंबोरकर, अक्षय निकुरे, देवा भंडारे, प्रवीण राऊत, शुभम पातलेकर, सचिन निकुरे, शुभम हूड, शंतनू चुनारकर, मंगेश ठाकरे, नारायण सोनवाणे, दुष्यंत भिमटे, संतोष बन्सोड, एकनाथ बोरकर,ओमन झोडे, सोमेश्वर निकुरे, साहिल कोलते, हेमंत पेंदाम, घनशाम बोरकर, स्वप्नील भंडारे, गौरव निकुरे, पवन पातलेकर, हिमांशू मेश्राम, कमलकिशोर चुनारकर आदींनी वृक्षारोपण उपक्रमात सहभाग दर्शवीला होता.


