राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा – गडचिरोली जिल्हा सिरोंचा तालुक्यातील 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुदुकृष्णापूर गावाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चालू करण्याची मागणी ग्रामस्थांनी करीत आहे.गेल्या तीन वर्षां पूर्वी जि, प ,प्राथमिक शाळा मुदुकृष्णापूर गावात शाळेत पटसंख्या कमी असल्याने शासनाद्वारे शाळा बंद ठेवल्यात आली, त्यावेळी पासून मुदुकृष्णापूर गावातील विध्यार्थीनी लांबडपल्ली गावातील शाळेत जात आहेत. मुदुकृष्णापूर गावातून लबडपल्ली गावातील शाळा दोन किलोमीटर अंतरावर असून वर्ग पहिली, दुसरीत असलेल्या विध्यार्थीना दोन किलोमीटर जाण्यास त्रास होत आहे, त्यामुळे मुले शिक्षणापासून दूर होत असल्याचे दिसून येत आहे. मुदुकृष्णापूर गावात विध्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढल्याने गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करून विध्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ना ठेवता ,शासनाने या समस्या कडे लक्ष देऊन, जबाबदारी घेऊन शाळा सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकाकडून होत आहे,