राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा – जिल्हा परिषद गडचिरोली अध्यक्ष अजय कंकडालवार हे बुधवारला सिरोंचा पंचायत समितीची विभाग प्रमुखांची आढावा सभेसाठी सिरोंचा दौऱ्यावर आले होते. सिरोंचा पंचायत समितीकडून आयोजित सर्व विभागाचे विभाग प्रमुखांची आढावा सभा आटोपल्यानंतर येथील आविसचे स्थानिक कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या मालकीच्या खुल्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम करून येथील व्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्या सुशिक्षित तरुणांना गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी जि.प.अध्यक्ष यांच्याकडे केली असता कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन पंचायत समितीला लागूनच असलेल्या दोन जुने कोंडवडे ,पडीत गोदामाची तसेच बँक ऑफ इंडिया समोरची पडीत असलेल्या बचत भवन या दोन्ही ठिकाणची जागेची त्यांनी स्वतःहून पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी प्रभारी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना पडीत गोदाम, बचत भवन सह कोंडवडे निर्लेखीत प्रस्तावासह दोन्ही ठिकाणी तब्बल दोनशे गाळे बांधकामासाठी लागणारे आवश्यक निधीची मागणीचे प्रस्ताव ही जिल्हा परिषदेला तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले, तसेच पंचायत समितीच्या जागेवर असलेल्या सर्व अतिक्रमण काढायला ही प्रभारी अधिकाऱ्यांना सांगितले. सिरोंचा पंचायत समितीचे मालकीचे जागेची पाहणी दरम्यान प्रभारी संवर्ग विकास अधिकारी विकास घोडे, पंचायत व शिक्षण विभागाचे अधिकारी, आविसचे ज्येष्ठ नेते मंदा शंकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव, आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम, आविस सल्लागार रवी सल्लम, मारोती गणापूरपू, श्याम बेज्जनीवार, साई मंदा, उपसरपंच अशोक हरी, तिरुपती चिट्याला, किरण वेमुला, सरपंच सुरज गावडे, सरपंच लक्ष्मण गावडे, लक्ष्मण बोल्ले रवी बॉंगोनी आदी उपस्तित होते.


