योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर – चिमूर तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय शंकरपूर च्या वतीने शंकरपूर वासीयांसाठी हनुमान किल्ला मंदिर सभागृह येथे आज भव्य नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन ग्राम पंचायत सरपंच साईश सतीश वारजूकर यांच्या हस्ते पार पडले तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी चिमूर पंचायत समितीचे उपसभापती रोषण ढोक तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत उपसरपंच अशोकजी चौधरी, चिमूर तालुका महिला तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य सविताताई चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा ग्राम पंचायत सदस्य गीताताई रानडे, ग्राम पंचायत सदस्य नितीन सावरकर, माजी अध्यक्ष तं. मु.स.तथा ग्राम पंचायत सदस्य माजित शेख, ग्राम पंचायत सदस्य संजयजी नंन्नावरे, ग्राम पंचायत सदस्य निखिल गायकवाड, ग्राम पंचायत सदस्य शंकरजी शेरकी, ग्राम पंचायत सदस्य राजना उईके, ग्राम पंचायत सदस्य सपणा घडसे, ग्राम पंचायत सदस्य वंदना सहारे, ग्राम पंचायत सदस्य बेबीताई डहारे, उपस्थित होते. विशेष म्हणजे प्रत्येक नेत्र तपासणी करणाऱ्याला ग्राम पंचायत कडून वृक्षरोप भेट स्वरूपात देण्यात आले.