किरण कुमार निमकंडे / अकोला
पातूर : कोरोना सारख्या महामारीच्या संकट काळात पत्रकार ज्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून आपल्या जवाबदार्या पार पाडत वृत्त संकलन करुन नागरीका पर्यंत बातम्या पोहचविण्याचे उल्लेखनीय कामगिरी बजावली या सोबत कोरोना अजुन गेला नसुन येणार्या तिसर्या लाटीच्या नियोजनार्थ पत्रकारांच्या जीवन संरक्षण साठी उपचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या वाढदिवसा निमीत्त पातूर तालुक्यातील पत्रकारांना एक लाख रुपयांचा मोबदला असलेला कोरोना कवच विमा काढण्यात आला या विमाच्या पॉलीसीचे वितरण सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय येथे करण्यात आले होते.या कार्यक्रम अध्यक्ष प्रदेश संघटक राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णा अंधारे हे होते तर उपविभागीय अधिकरी बाळापुर डॉ.रामेश्वर पुरी पातूरचे तहसिलदार दिपक बाजड, विरपिता कांशीराम निमकंडे,जेष्ठ नागरिक संघाचे नारायणराव अंधारे, कृष्णा अंधारे आदि मान्यवर प्रमुख ऊपस्थित होते. यावेळी पत्रकार उमेश देशमुख, प्रदिप काळपांडे , मोहन जोशी, संगीताताई इंगळे, संतोष कुमार गवई, निशांत गवई, साजीद सर, नातिक शेख, देवानंद गहिले, किरण निमकंडे, पंजाबराव इंगळे, प्रविण दांडगे, प्रमोद कढोणे, अविनाश पोहरे, पवन तांबे, स्वप्नील सुरवाडे, राम वाढी, राजाराम देवकर, या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.सौ.सपना राऊत, रामकुमार अमानकर यांनी केले. विनायक वास्तकार,सुधाकर गव्हाले, दीपक इंगळे,विजय टाळे, राजु मोकळकर,महादेव दुतोंडे, पुरुषोत्तम टाळे, आदि उपस्थीत होते.