वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
दिनांक १५/०८/२०२१ पर्यंत वेतन विषयक व इतर बाबींवर योग्य निर्णय न झाल्यास राज्य भरातील कोतवाल संप करणार आहे त्या संपास राळेगाव तालुक्यातील सर्व कोतवाल सहभाग नोंदवुन सहभागी होईल असे निवेदन आज दिनांक ०९/०८/२०२१ रोजी मा. उपविभाग अधिकारी साहेब राळेगाव व मा. तहसीलदार साहेब राळेगाव यांना राळेगाव तालुका कोतवाल संघटने च्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा यवतमाळ च्या महीला जिल्हा अध्यक्ष सौ छाया गणेशराव दरोडे व तालुका अध्यक्ष श्री पंढरी सावरकर उपविभागीय अध्यक्ष अमित थुल सचिव श्री रुपेश चांदेकर व मोठ्या संख्येने कोतवाल बंधु भगिनी उपस्थित होते