आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना सूचना.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर – प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्याचे काम आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या नेहमी करीत असतात. मतदार संघातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या सतत पाठपुरावा करीत असतात. जुना कुनाडा येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे बैठक बोलावून त्यांना जुना कुनाडा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या समस्या त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यात. त्यासोबतच अनेक विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार शिंतोडे, मुख्याधिकारी पिदूरकर, संवर्ग विकास अधिकारी, वेकोलिलचे अधिकारी, वर्षाताई ठाकरे व प्रकल्पग्रस्त उपस्थिती होती. यामध्ये कुनाडा गावाचे पुनर्वसन नगर पालिका क्षेत्रात करण्यात आलेले आहेत. तेथील प्लॉट हे प्रकल्पग्रस्थांच्या नावाने नसल्यामुळे त्यांची नगर पालिकेत नोंद नाहीत. कुनाडा गावाला वेकोलि कडून पाणी आणि विद्युत पुरवठा देण्यात येत होता. परंतु आता वेकोलिने बंद केला असून तो पूर्ववत सुरु करण्यात यावा. पुनर्वसन हे नगर पालिका क्षेत्रात झालेले असून सुद्धा कुनाडा गावामध्ये अजूनही सचिव कार्यरत आहेत. जुना कुनाडा प्रोजेक्ट ४१० एकर येथील प्रकल्पग्रस्तांना २०१२ च्या पॉलिसी प्रमाणे नोकरी देण्यात यावी या मागण्या या बैठकीत ठेवण्यात आल्या होत्या. यातील मागण्या येत्या काही दिवसात निकाली निघणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना सांगितले.


