गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नजीक खंडाळा व परिसरात जिल्ह्य़ात सर्वाधिक संत्रा लागवड असुन दरवर्षी नैसर्गिक संकट व पावसाचा लहरीपणा मुळे संत्रा बागाचे नुकसान होत असल्याने शेतकरी विमा काढतात परंतु या परिसरात पाऊसच झाला नसता येथे असलेल्या स्कायमेट च्या यंत्राने पावसाची नोंद घेतल्याने विम्यापासुन शेतकरी वंचित राहणार असल्याने त्यांनी शाशन व प्रशासनाला तक्रारी केल्या असता आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पाहणी केली असता स्कायमेट चे अधीकारी उपस्थित असता शेतकर्यांनी प्रश्न उपस्थित केला असता ते मात्र निरुत्तर झाले सदर दौऱ्यात त्यांचे समवेत उपविभागीय अधिकारी आकोट जिल्हा कृषी अधिकारी खोत तेल्हारा तहसिलदार डाॅ संतोष येवलीकर तालुका कृषि अधीकारी मिलिंद वानखेडे गटविकास अधिकारी भारत चव्हाण विस्तार अधिकारी सरोदे तसेच स्कायमेट चे रेणके
खंडाळा चितलवाडी येथील शेतकर्यांनी 14 व 15 जुलै रोजी पाउस पडला नसता स्कायमेट च्या यंत्राने कसी नोंद घेतली या बाबत शेतकर्यांनी मॅडम च्या निदर्शनास आणून दिले व हा कंपनीचा शेतकर्यांना विम्याचा लाभापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला सदर प्रकाराबद्दल स्कायमेट चे अधीकारी रेणके यांना चांगलेच धारेवर धरले असता ते निरुत्तर झाले या बाबत येथील शेतकरी पुरुषोत्तम वाघोडे मा उपसरपंच दीपक धुळ उध्दव सांगुनवेढे चितलवाडी चे मनिष महाले लक्ष्मण इंगळे याचेसह 140 शेतकऱ्यांच्या सह्यासह भारत सरकार महाराष्ट्र शासन व प्रशासनासह पालकमंत्री बच्चु कडू आमदार अमोल मिटकरी आमदार नितीन देशमुख यांना निवेदन दिले आहे व सदर प्रकाराबद्दल जिल्हाधिकारी मॅडम कडुन न्याय मिळेल या बाबत शेतकर्यांनी अपेक्षा व्यक्त केली आजच्या दौऱ्यात तहसिलदार व त्यांची चमु मंडळातील सर्व पटवारी तसेच सर्व कृषि सहाय्यक हे हजर होते. मात्र काहि स्थायी ग्रामसेवक अदृश्य होते ग्रामसेवकावर गट विकास अधिकारी साहेबचा दबदबा नाही का असा प्रश्न सुद्धा नागरिकांना यावेळेस पडला होता. खंडाळा दौरा झाल्यानंतर जिल्हाधिकारी मॅडम हे आदिवासी गावात भेट देण्याकरिता गेले होते सदर भेटीमध्ये आदिवासी पुनर्वसित गाव तलाई, नंतर वान धरण हनुमान सागरला जिल्हाधिकारी मॅडमनी भेट दिली व धरणाच्या पाण्याच्या विषयी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या











