गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा:- अवधा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील रवींद्र महादेव इंगळे यांच्या खून प्रकरणात आरोपी विठ्ठल किसन इंगळे यास जन्मठेप व सक्त मजुरी तसेच तीस हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम कृतक रवींद्र इंगळे यांच्या पत्नीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश २ मे २०२४ रोजी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी आर कदम मलकापूर यांनी दिला आहे याबाबत सविस्तर असे की अवधा तालुका नांदुरा येथे राहणारे रवींद्र महादेव इंगळे यांच्यावर ८ जून २०१० रोजी आरोपी विठ्ठल किसन इंगळे याने भाल्याने प्राण घातक हल्ला केला होता. यावरून पोलीस स्टेशन नांदुरा तालुका नांदुरा येथे मृतक रवींद्र इंगळे यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून भादवी कलम ३०२ गुन्हा ८४/१० दाखल केला होता गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल पाटील व त्यांचे सहकारी रायटर पो.हे. राजू चौधरी यांनी करून तपासाअंती दोषारोशपत्र विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय मलकापूर येथे दाखल करण्यात आले होते सदरचे सदरच्या प्रकरणात पेरवी अधिकारी पोलीस पो .हे.कॉ. कडू बोरसे यांनी काम केले. सदरच्या प्रकरणात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन मृतकाची पत्नी व अन्य साक्षीदार तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या पुराव्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने सदरच्या प्रकरणात अंतिम सुनावणी घेऊन सरकार पक्षातर्फे एडवोकेट विवेक बापट सहाय्यक सरकारी अभियंता यांनी केलेल्या युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीने व मृतक रवींद्र महादेव इंगळे यांच्या खून प्रकरणात भादविचे कलम ३०२ नुसार आरोपी विठ्ठल किसन इंगळे यास सक्तमजुरी व जन्मठेप तसेच दंड ३० हजार रुपये देण्याचा आदेश करण्यात आला तसेच दंडाची रक्कम ३०हजार रुपये मृतकाच्या पत्नीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश २ मे २०२४ रोजी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी आर कदम मलकापूर यांनी दिला आहे.











