विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड :खरुस गावातील तीन जण गंभीर अपघातामध्ये जागीच ठार झाले असून यातील जखमींना नांदेड येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरखेड तालुक्यातील खरुस येथील पाच जण कारने छत्रपती संभाजीनगर येथून परत गावाकडे येत असताना त्यांची भरधाव कार शनिवारी पहाटेच्या सुमारास सेनगाव ते नर्सी ना. मार्गावरील गिलोरी पाटी जवळील वळण रस्त्यावर आली असता चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या खाली असलेल्या एका झाडावर आदळली. या घटनेची माहिती मिळतात नर्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी अपघातात कारमधील अनिरुद्ध तानाजी वानखेडे वय २८व अर्चना सुभाष वानखेडे वय ३७ दोघे रा. खरूस ता. उमरखेड यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. तर सुभाष वानखेडे, संतोष वानखेडे, व अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी नर्सी ना. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी नर्सी ना.पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.











