विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड:तालुक्यातील मौजे धानोरा सा येथील तरुण शेतकऱ्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय कार्य करून आपल्या सोबत गावातील इतर शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्याकरिता तयार केले .व त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून चांगले उत्पंन मिळवून दिले .मागील काही वर्षांपासून प्रकाश काळे हे रेशिमचे विक्रमी उत्पादन घेत आहेत .त्यामुळे त्यांना वेळोवेळी सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघ यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय युवा शेतकरी उध्योगभूषण पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे .हा पुरस्कार १जुले २०२४रोजी माऊली संकुल सभागृह अहमदनगर या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे.