अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : पातुर येथील डॉ.एच. एन. सिन्हा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे १७ फेब्रुवारी २०२४ रोजी दत्तक ग्राम शिर्ला अंधारे येथे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.दादाराव हुशंगाबादे, आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती हे होते. उदघाटक म्हणून गुलाबराव ताले पाटील, महाविद्यालय विकास समिती डॉ. एच.एन.सिन्हा महाविद्यालय पातुर तथा आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ.विवेक हिवरे हे होते. सर्व प्रथम शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ किरण खंडारे यांनी केले.यावेळी सर्व मान्यवरांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्देश व राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमाबद्दल स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ दिपाली घोगरे व आभार प्रदर्शन डॉ चंदन राठोड यांनी केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, स्वयंसेविका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.


