बापू मुळीक:
तालुका प्रतिनिधी पुरंदर
सासवड येथेग्राहकांच्या हितासाठी काम करणाऱ्या पुरंदर ग्राहक कल्याण फाऊंडेशन या संस्थेच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून डॉ. दळवी मेडीकल फाउंडेशनने एक स्तुत्य काम केले आहे. ग्राहक कल्याण संघाच्या सासवड येथे झालेल्या मासिक सभेत हा उपक्रम राबवण्यात आला.रक्तदाब, मधुमेह ईसीजी व अन्य स्वरूपाच्या तपासण्या करून त्यावर सल्ला आणि औषधोपचार केल्याची माहिती दळवी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ राजेश दळवी यांनीदिली. सासवड, शिवरी पांगारे, कोडित, उदाचीवाडी, वनपुरी इत्यादी गावांतून आलेल्या सुमारे तीस सभासदांनी याचा लाभ घेतल्याची माहिती डॉ. राजेश दळवी यांनी दिली.ग्राहक फाउंडेशनचे राज्य कार्यकारणी सदस्य अस्लम तांबोळी, तालुका प्रतिनिधी संतोष काकडे, जेष्ठ नागरीक अंकुश कामथे व स्वानंद लोमटेयांनी या वेळी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.दळवीमेडिकल फाउंडेशनच्या डॉ. मंजुषा दळवी यांसह रुपाली लोहकरे, आकांक्षा पोतदार, अंकिता कुंजीर, पल्लवी जाधव, भुषण बोराडे,कल्याणी घारे,उत्तम झेडे,संतोष मगर,रामदास मेमाणे,संतोष काले,सुलके यांनी आरोय शिबिराचे उत्तम संयोजन केले. फाउंडेशनच्या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल अनेकांनी दळवी यांचे अभिनंदन केले.