अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : 13 फेब्रुवारी 2024 रोजी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मा.बच्चन सिंग यांनी पातुर पोलीस स्टेशन येथे भेट देऊन वार्षिक निरीक्षण निमित्त पातुर पोलीस स्टेशनच्या कार्याचा आढावा घेतला अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पातुर पोलीस स्टेशनला भेट दिली. यादरम्यान त्यांनी ड्रेस कोड तसेच पातुर पोलीस स्टेशन मधील हेड मोरर कॅश मोरर, स्टेशन डायरी, क्राईम अशा अनेक बाबीची त्यांनी निरीक्षण करून बारकाईने पाहणी केली.यावेळी त्यांनी पोलीस कवायत घेतली.याप्रसंगी पातुर पोलीस स्टेशन मधील ड्रेस कोड आणि इतर व्यवस्थापनाचे त्यांनी कौतुक करताना पोलिसांनी बारकाईने तपास करून जनतेला व प्रत्येक पीडितेला पोलीस विभागाकडून न्याय देण्याच्या अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या या सोबत त्यांनी प्रत्येक पोलिसांशी संवाद साधण्यासाठी दरबार घेतला यादरम्यान त्यांनी मार्गदर्शन करताना पोलिसांनी ताणतणाव मुक्त जीवनशैली जगावे व कुटुंबाबाबत स्वतःबाबत काळजी घ्यावी असे आवाहन करून मार्गदर्शन केले आणि पोलीस कल्याण संबंधी कोणतेही प्रकरण प्रलंबित राहणार नाही असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. यासोबतच पातुर पोलीस स्टेशन येथील दोन क्वार्टर बांधकाम झाल्याने या नवीन बांधकामाची त्यांनी पाहणी केली त्यानंतर इतर क्वार्टर सुद्धा लवकरच बांधून देण्याकरता पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.पातुर पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आले असता त्यांना सर्वप्रथम उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज आणि पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात पातुर पोलिसांनी मानवंदनेची सलामी देऊन त्यांचे स्वागत केले
पोलीस अधीक्षक यांनी पातुर पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणाच्या आढावा बैठकीत समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या बैठकीत ,पोलीस अधिकारी, पत्रकार बांधव,युवा समिती यावेळी उपस्थित होते.


