अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : पो.स्टे पातुर येथे आज दिनांक १५/०२/२०२४ रोजी १७/०० वा येणा-या आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमीत्याने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ नये व जातीय सलोखा अबाधीत राहावा व शांतता प्रस्थापीत राहावी या करीता मा पोलीस अधिक्षक बच्चन सिंग साहेब अकोला यांचे आदेशाने रूट मार्चचे आयोजन केले होते, त्यामध्ये मा.गोकुळ राज सहायक पोलीस अधिक्षक सा बाळापुर, पो.स्टे.पातुर ठाणेदार किशोर शेळके,पोलीस निरीक्षक, पोउप अभीषेक नवघरे व १५ पोलीस अंमलदार व पोलीस नियंत्रण कदा अकोला येथील आर सी पी चे एक अधीकारी व १६ पोलीस अंमलदार व पोलीस मुख्यालय अकोला येथील ९९ पोलीस अंमलदार व दोन बीट मो सा व ४ पोलीस वाहनांसह पातुर शहरातुन पो रटे वरून, बाळापुर रोड, नगर पालीका, मिलींद चौक, संभाजी चौक, सिदाजी चेटाळ, भोईपुरा, भगत वेटाळ, विरा चौक, देवळी मैदान, प्राथमीक आरोग्य केंद्र पातुर, मीश्रीशा बाबा दर्गा गुरुवार पेठ बाजार रोड पो स्टे ला परत अशा प्रकारे रूट मार्च १८/०० वा पर्यत घेण्यात आला.