अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातुर : पोलीस स्टेशन पातुर येथे आगामी उत्सव छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा भंग होउ नये अथवा जातीय सलोखा अबाधीत राहावा या करीता दि १६/०२/२०२४ रोजी संभाजी चौक पातुर येथे रंगीत दंगा काबु योजना घेण्यात आली.त्यामध्ये पो. स्टे. ठाणेदार किशोर शेळके,पो.उप नी.अभिषेक नवघरे व १६ पोलीस अंमलदार व एक नगरपालिका पातुर येथील अग्नीशामक दलाची मोठी गाडी व त्यांचा स्टॉफ यांनी सहभाग घेतला होता.


